रावेर तालुक्यातील केळी पट्ट्यात खासदार रक्षा खडसे यांचे उत्स्फूर्त स्वागत

0

रावेर : रावेर लोकसभेच्या महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी रविवारी रावेर तालुक्यातील बक्षीपूर, रसलपूर, रमजीपूर, खिरोदा प्र.रावेर, वाघोड, केर्‍हाळा बु.॥ भागात रविवारी दुपारी प्रचार दौरा केला. यावेळी ग्रामस्थांच्या त्यांनी भेटी-गाठी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. ठिकठिकाणी सुवासिनींनी खासदार खडसेंचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले.

मतदारांशी साधला संवाद
रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी रविवारी सकाळी रावेर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षातील पदाधिकार्‍यांसह रावेर तालुक्यातील मौजे वाघोदा बु.॥, चिनावल, कोचुर बु.॥, कोचुर खु.॥, रोझोदा, खिरोदा प्र.यावल आदी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

भाजपाला मतदानाचे केले आवाहन
खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे आदी मित्र पक्षातील पदाधिकार्‍यांसह रावेर तालुक्यातील मौजे बक्षीपूर, रसलपूर, रमजीपूर, खिरोदा प्र.रावेर, वाघोड, केर्‍हाळा बु.॥ आदी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधत भाजपाला मतदानाचे आवाहन केले.

बोदवड तालुक्यात उद्या प्रचार दौरा
खासदार रक्षाताई खडसे या सोमवारी बोदवड तालुक्यात प्रचार दौरा करणार आहेत. सकाळी साडेसात वाजता नाडगावपासून त्यांच्या दौर्‍याला सुरूवात होईल. एनगाव, मनुर तर दुपारी 12.30 नंतर लोणवाडी, जामठी, येवती, शेलवड, जलचक्र, दुपारी साडेचार वाजता साळशिंगी, बोदवड शहर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, शिवद्वार, नगरपंचायत, बारभाई गल्ली, म्हसोबा मंदिर, स्वामी विवेकानंद नगर, कोर्ट, जामठी दरवाजा, गणेश चौक, राम मंदिर, जुनी सेंट्रल बँक, जैन मंदिर, स्थानक, सुराणा निवास, रेणुका मंदिर, शिवद्वार, गांधी चौक, मेन रोड, डॉ.आंबेडकर चौक आदी भागात त्या प्रचारदौरा करतील.


कॉपी करू नका.