एकनाथ शिंदेंना संपवण्याचा उद्धव ठाकरेंनी आखला कट : राजू वाघमारे यांचा खळबळजनक आरोप

0

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी धक्कादायक आरोप करीत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट उद्धव ठाकरे यांनी रचला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. नक्षलवादी भागात एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा न देता त्यांना संपवण्याचा डाव हा उद्धव ठाकरे यांचा होता, असे ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेेत म्हणाले आहेत.

सत्ता स्थापण्यासाठी दोनवेळा बैठका
उद्धव ठाकरे यांना बाजूला करुन सत्ता स्थापनेसाठी संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या होत्या. संजय राऊतांनी हॉटेल हयातमध्ये घेतलेल्या दोन बैठकांना अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती, असा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी करत राऊतांवर जोरदार आरोप केला.

एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट
राजू वाघमारे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट आखून सिक्युरिटी नाकारली होती. शिंदे यांना बाजूला करुन आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे होते, महाविकास आघाडी असतानाच संजय राऊत यांनी बैठक घेतली. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून बैठक घेतली, त्यांना सगळंच हवं होते, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांचे नाव आम्ही नारद मुनी ठेवलं आहे, अफवा जास्तीत जास्त कशा पासरवल्या जातील, हे ते करत आहेत, महाराष्ट्र हे जाणून आहे, असेही वाघमारे म्हणाले.


कॉपी करू नका.