खासदार रक्षा खडसे यांचा बोदवड तालुक्यात रणरणत्या उन्हातही प्रचार दौरा

नरेंद्रजी मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदानाचे आवाहन

0

MP Raksha Khadse’s campaign tour in Bodwad taluka even in scorching sun बोदवड : रावेर लोकसभेच्या महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी सोमवारी सकाळी बोदवड तालुक्यात प्रचार दौरा केला. सकाळी साडेसात वाजेपासून प्रचार दौर्‍याला सुरूवात झाली. बोदवड तालुक्यातील मौजे नाडगाव, एनगाव, मनुर बु., लोणवाडी, जामठी आदी भागांमध्ये जावून त्यांनी प्रचार केला.

विविध पदाधिकार्‍यांची उपस्थिती
खासदार खडसे यांचे ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण केले. यावेळी खासदारांनी मतदारांना भेटून त्यांची अडी-अडचणी जाणून घेतल्या. तिसर्‍यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बोदवड तालुक्यातील मौजे नाडगाव, एनगाव, मनुर बु., लोणवाडी, जामठी आदी गावांमध्ये प्रचारार्थ दौरा करण्यात आला.


कॉपी करू नका.