भुसावळातील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव : अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी दाखल केलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अनोळखीची माहिती शेअर केल्यानंतर नातेवाईकांनी रविवार, 28 रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर मयताची ओळख पटली. जयवंत देवराम मगरे (58, रा.भुसावळ) असे मृताचे नाव आहे.

जिल्हा पेठ पोलिसात मृत्यूची नोंद
गुरुवार, 25 रोजी अत्यवस्थ प्रकृती झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेव्हा त्यांची अनोळखी व्यक्ती म्हणून नोंद झाली होती. शुक्रवार, 26 रोजी त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. पोलीस हेड कॉन्सटेबल शरीफ रहीम शेख यांनी तपासातून अनोळखीची ओळख पटविली.


कॉपी करू नका.