बेरोजगारीचा प्रश्न कमी करण्यासाठी उद्योगधंदे वाढविणार : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील

0

मलकापूर : मलकापूर विधानसभा मतदार संघातील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कमी करण्यासाठी भावी काळात आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. रावेर लोकसभा मतदार संघातील मलकापूर विधानसभा मतदार संघातील मोरखेडा येथील नागरिकांशी श्रीराम पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांनी युवकांच्या बेरोजगारीसह अन्य समस्यांचा पाढा वाचला.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद कोलते, एस.एस.मोरे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष रशीदखा जमादार, हरिष रावळ, शाम राठी, संतोष रायपूर, मोहन पाटील, शिवसेना संघटक राजेशसिंग राजपूत, काँग्रेस महिला अध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वनिता पाटील, राजू पाटील, अरुण अग्रवाल, बंडूभाऊ चौधरी, गजानन ठोसर, ईश्वर राहणे (मुक्ताईनगर), अनिल अहुजा, दीपक चांभारे, डोरले, सोपान शेलकर, लखन कुरेशी, प्रवीण पाटील, अ‍ॅड.बंगाळे, विलास कांडेलकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


कॉपी करू नका.