मलकापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे जल्लोषात स्वागत

0

मलकापूर : मलकापूर विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौर्‍यात नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. त्यावेळी या भागात कार्यकर्त्यांनी व मतदारांनी जल्लोषात स्वागत केले.

नागरिकांच्या जाणल्या समस्या
मलकापूर तालुक्यातील रणगांव, भालेगाव, हिंगणा काझी, देवधाबा, खामखेड रेल्वे, नरवेल व धरणगाव या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी प्रचारावेळी नागरिकांच्या भेटी घेतल्या. विविध गावातील प्रश्न व समस्या समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद कोलते, अ‍ॅड.मोरे, माजी नगराध्यक्ष हरीश रावळ, रशीद खा जमादार, राष्ट्रवादी संघटक मोहन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष रायपुरे, शिवसेना संघटक राजेशसिंग राजपूत, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिता गायकवाड, वंदना पाटील, काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रीती भगत यासह या गावांमधील ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


कॉपी करू नका.