पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान पदासाठी संधी द्या

खासदार रक्षा खडसे : रणरणत्या उन्हातही बोदवड तालुक्यात प्रचार दौर्‍यात मतदारांशी साधला संवाद

0

बोदवड : रावेर लोकसभेच्या महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी सोमवारी दिवसभरात बोदवड तालुक्यात प्रचार दौरा केला. बोदवड तालुक्यातील मौजे येवती, शेलवड, वराड, मुक्तळ, जलचक्र बु., जलचक्र खु., साळशिंगी आदी गावांमध्ये जावून त्यांनी प्रचार रॅली काढली. यावेळी मतदारांशी हितगुज त्यांनी करीत लग्नसमांरभात हजेरी लावत नववधू-वरांना आशीर्वाद दिले.

भाजपाला मतदान करण्याचे आवाहन
रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह बोदवड तालुक्यातील मौजे येवती, शेलवड, वराड, मुक्तळ, जलचक्र बु., जलचक्र खु., साळशिंगी ई. गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.

 


कॉपी करू नका.