स्व.मधुकरराव चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदारसंघात पूर्ण करणार !

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांची ग्वाही : फैजपूरात स्व. चौधरींच्या पुतळ्यास अभिवादन करीत प्रचाराला सुरुवात

0

फैजपूर : विधानसभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या फैजपूर येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी अभिवादन केले. माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब स्व.जे.टी.महाजन यांच्या फैजपूर येथील इंजिनिअरींग कॉलेजमधील पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आले. स्व. मधुकरराव चौधरी यांनी रावेर तालुक्यात जलसिंचनाचे प्रकल्प बांधून पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवला आहे. स्व.चौधरी यांचा आदर्श घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघात शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी यावेळी दिले. त्यानंतर यावल तालुक्यात मंगळवारी प्रचाराची सुरुवात करण्यात आली. मारुळ येथील नागरिकांशी यावेळी संवाद साधत चर्चा करण्यात आले.

मतदारांकडून श्रीराम पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात प्रचार दौर्‍यात सुरुवात झाली. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील, जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, जि.प.चे माजी सदस्य प्रा.नीलिमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख, वसीम जनाब, प्रशांत पाटील, डॉ.आर.वाय.चौधरी, व्ही.आर.पाटील, एन.ए.भंगाळे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.