आमदार लता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंची खासदार खडसेंनी घेतली भेट

0

जळगाव : शिवसेना नेते तथा चोपडा विधानसभा माजी आमदार चंद्रकांत सोनावणे व आमदार लताताई सोनावणे यांची त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानी खासदार रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोनवणे दाम्पत्याने त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

चोपडा विधानसभेत शिवसेना संपूर्ण ताकदीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपा तथा महायुती उमेदवार यांना जास्तीत-जास्त मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन खासदार खडसेंना यावेळी देण्यात आले.


कॉपी करू नका.