सहकारमहर्षी स्व.जे.टी.महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील

न्हावी, मारुळ भागात उमेदवार श्रीराम पाटील यांचे मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत

0

फैजपूर : यावल तालुक्यातील न्हावी येथे माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब स्व.जे.टी.महाजन यांच्या पुतळ्यास महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत प्रचारास सुरुवात केली. यावेळी गावकर्‍यांनी मोठी गर्दी करीत श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी उपस्थित होते. सहकारमहर्षी स्व.जे.टी.महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार असल्याची ग्वाही उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदारांशी बोलताना दिली.

सहकारमहर्षी स्व.जे.टी.महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात न्हावी येथे प्रचार दौर्‍यात ग्रामस्थांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधण्यात आला. नागरिकांचे प्रश्न यावेळी एकूण घेत सहकारमहर्षी दादासाहेब स्व.जे.टी.महाजन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण भावी काळात काम करू, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली.

यांचा प्रचार दौर्‍यात सहभाग
यावेळी लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील, जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, न्हावीचे सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच नदीम पिंजारी, विलास चौधरी, भानुदास चोपडे, वामन तायडे, मधुकर झोपे, सरफराज तडवी, वामन तायडे, चेतन झोपे , देवेंद्र चौधरी, चेतन इंगळे, सोनू झोपे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


कॉपी करू नका.