मुक्ताईनगरात महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांचा प्रचार दौरा

तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदानाचे आवाहन

0

मुक्ताईनगर : रावेर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मंगळवारी मुक्ताईनगर शहरात प्रचार दौरा केला. यावेळी मतदारांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले तर ठिकठिकाणी त्यांचे औक्षणही करण्यात आले.

नरेंद्र मोदींजींना पंतप्रधान करण्यासाठी मतदानाचे आवाहन
रावेर लोकसभा निवडणुकीतील भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मंगळवारी मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह मुक्ताईनगर शहरात प्रचार दौरा केला. यावेळी मतदारांची प्रत्यक्ष भेट मतदारांशी संवाद साधण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन खासदारांनी यावेळी केले.


कॉपी करू नका.