अंजाळेत सदगुरु जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या समाधीस्थळाचे महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांनी घेतले दर्शन

0

यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथील आजन्म पायी वारकरी स्वा.सु.सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या समाधीस्थळाचे मंगळवारी लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी घेतले दर्शन. श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रावेर लोकसभेचे उमेदवार आहेत. सध्या त्यांचा संपुर्ण मतदार संघात प्रचार सुरू आहे. सर्वस्तरातील नागरिकांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकरआप्पा सोनवणे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुलदादा पाटील, अंजाळे गावाचे सरपंच यशवंत अण्णा सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य आनंद सपकाळे, शांताराम सपकाळे, जनार्दन बाळू सोनवणे, नारायण तुळशीराम सपकाळे, भिका नामदेव सपकाळे, गजानन पाटील, खेमचंद्र सोनवणे, प्रेमचंद्र सोनवणेसह आदींची उपस्थिती होती. संपूर्ण अंजाळे गावातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी पाठिंबा देत समर्थन देण्यात आले आहे.


कॉपी करू नका.