रावेर लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार ! उमेदवार संजय ब्राह्मणे

0

भुसावळ : रावेर लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा निश्चितपणे झेंडा फडकेल, असा विश्वास वंचित आघाडीचे रावेर लोकसभेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना व्यक्त केला.

आव्हान कुणाचेही नाही : मतदारांपर्यंत पोहोचणार
रावेर लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीतर्फे भुसावळचे जावई व अभियंता असलेल्या संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना भाजपा व महाविकास आघाडीचे आपल्यापुढे आव्हान असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, आमच्यापुढे कुणाचेही तसे पाहिले तर आव्हान नाही. आम्ही आगामी 12 दिवसात लोकसभेतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहोत, त्यासाठी आमचा वंचित आघाडीचा कार्यकर्ता झटत आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी असल्याचे ते म्हणाले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष बाळा (विजय) पवार व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.