यावल-रावेर तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच वंचितचा ध्यास : संजय ब्राह्मणे यांचा निश्चय

0

भुसावळ : रावेरसह यावल तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच वंचित बहुजन आघाडीचा ध्यास असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी व्यक्त केले. यावल तालुक्यातील शिरसाड साकळी, दहिगाव कोरपावली मनवेल थोरगव्हाण इत्यादी गावांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांनी भेटी दिल्या व मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या विकासाचे व्हिजन मांडले.

यांची होती उपस्थिती
संजय ब्राह्मणे म्हणाले की, आगामी काळात रावेर-यावल तालुक्यातून जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमची खरी ताकद आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव योगेश तायडे, शिरसाडचे सरपंच दीपक इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, वंदना आराख, ईश्वर लहासे, बबन कांबळे यांच्यासह तालुकाध्यक्ष भगवान मेघे,राजेंद्र बारी यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.