भुसावळ तालुक्यात अनेक पदाधिकार्‍यांचा भाजपात प्रवेश

0

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अनेक पदाधिकार्‍यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भुसावळ भाजपा प्रचार कार्यालयात खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला.

पदाधिकार्‍यांची उपस्थिती
भुसावळ येथे भारतीय जनता पार्टी मार्फत रावेर लोकसभा क्षेत्र प्रचारार्थ सुरू करण्यात आलेल्या प्रचार कार्यालयात खासदार रक्षाताई खडसे यांनी गुरुवारी भेट दिली. आमदार संजय सावकारे यांच्यासह प्रचार नियोजनाबाबत भाजपा व महायुती मधील मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. तसेच यावेळी भुसावळ तालुक्यातील रा.काँ. (शरदचंद्र पवार) पार्टीच्या अनेक पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.


कॉपी करू नका.