रावेर लोकसभेत वंचित बहुजन आघाडीलाच यश मिळणार : उमेदवार संजय ब्राह्मणे

परिवर्तन होणार असल्याचा विश्वास : जामनेर तालुक्यात प्रचार दौरा

0

Vanchit Bahujan Aghadi will succeed in Raver Lok Sabha: Candidate Sanjay Brahmane भुसावळ : रावेर लोकसभेत यावेळी परिवर्तन निश्चितपणे होणार असून वंचित बहुजन आघाडीला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास वंचित आघाडीचे रावेर लोकसभेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी जामनेर तालुक्यातील प्रचार दौर्‍यात व्यक्त केला. जामनेर तालुक्यातील जामनेरसह फत्तेपूर, शेंदुर्णी, वाघरी, वडाळा, तिघे्र आदी भागात त्यांनी नुकताच प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी ठिकठिकाणच्या मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.

परिवर्तन होणार : संजय ब्राह्मणे यांचा विश्वास
यावेळच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास संजय ब्राह्मणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जामनेर तालुक्यातील मतदारांकडून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मतदारसंघात समस्या ब्राह्मणे यांनी जाणून घेतल्या. यावेळी वंचित आघाडीला संधी देण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली.
प्रचार दौर्‍यावेळी युवा जिल्हाध्यक्ष बाळा (विजय) पवार व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.