भुसावळातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये आज खासदार रक्षाताई खडसेंच्या प्रचारार्थ दौरा

0

Campaigning tour of MP Rakshatai Khadse in Ward No. 19 in Bhusawal भुसावळ  : भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 19 मध्ये भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. अष्टभूजा देवी मंदिरापासून सायंकाळी पाच वाजता दौर्‍याला प्रारंभ होईल.

पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन
प्रचारास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे, माजी नगरसेवक पुरूषोत्तम नारखेडे, माजी नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, शहर उपाध्यक्ष रवी ढगे, बूथ विस्तारक रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.

 


कॉपी करू नका.