मतदारसंघाचा विकास हाच ध्यास : खासदार रक्षाताई खडसे

फैजपूरसह यावल तालुक्यात प्रचार दौरा : भाजपाला मतदानाचे आवाहन

0

यावल : गेल्या दहा वर्षाच्या काळात अनेक विकासकामे करण्यात आली असून पुढील काळात आणखी उर्वरित कामे करण्यासाठी भाजपाला संधी द्यावी, असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी मतदारांना प्रचारादरम्यान केले. शनिवार, 4 मे रोजी फैजपूरसह यावल तालुक्यात त्यांनी प्रचार दौरा केला. यावेळी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले तर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

या भागांमध्ये प्रचार दौरा
शनिवार, 4 मे रोजी रावेर लोकसभा महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी यावल तालुक्यातील किनगाव बु.॥, किनगाव खु.॥, नायगाव, दहिगाव तसेच फैजपूर भागात प्रचार दौरा केला.

पुन्हा संधी देण्याचे केले आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी यावल तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह यावल तालुक्यातील किनगाव बु., किनगाव खु., नायगाव, दहिगाव आदी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्रीनरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.


कॉपी करू नका.