राष्ट्रवादीतच कायम राहणार ! : श्रीराम पाटील यांना लीड देणार ही माझी गॅरंटी : अ‍ॅड.रोहिणी खडसेंचा दावा

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन

0

Will remain in the Nationalist! : My guarantee to give lead to Sriram Patil : Adv. Rohini Khadse’s claim मुक्ताईनगर : एकनाथराव खडसे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यावर मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांचे मी आभार मानले. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगरातील प्रचार सभेत केले. रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचार सभा पार पडली. मुक्ताईनगरातून श्रीराम पाटील यांना लीड मिळवून देणार ही आपली गॅरंटी असल्याचे रोहिणी यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

श्रीराम पाटील यांना लीड न मिळाल्यास स्वतः जवाबदार : रोहिणी खडसे
अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठेने काम करणार आहे. पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी माझ्या प्रत्येक बुथ वरचा कार्यकर्ता हा जोमाने काम करीत आहे. श्रीराम पाटील यांना मताधिक्य मिळवून देईल, अशी गॅरंटी आपली असून लीड न मिळाल्यास मी त्यास जवाबदार असेल, असेही त्यांनी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश एकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना उबाठा गट संपर्क प्रम्मुख संजय सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. र

 


कॉपी करू नका.