यावल तालुक्यात खासदार रक्षाताई खडसेंनी मतदारांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा संधी देण्यासाठी भाजपाला मतदानाचे आवाहन

0

यावल  : रावेर लोकसभेतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी यावलसह तालुक्यातील न्हावी येथे शनिवारी प्रचार दौरा केला.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी यावल तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे आदी मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह न्हावी (यावल) येथे प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.


कॉपी करू नका.