वंचित आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या विजयासाठी पत्नीने खोचला पदर

भुसावळात तालुक्यात वंचित आघाडीचा प्रचार दौरा संजय ब्राह्मणे यांना विजयी करण्याचे आवाहन

0

भुसावळ : रावेर लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीने भाजपा व महाविकास आघाडीपुढे आपले आव्हान निर्माण केले आहे. दोन दिवसांपूर्वीच वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांची भुसावळातील डी.एस.ग्राउंडवरील मैदानावर जाहीर सभा झाल्यानंतर वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यातच वंचित आघाडीतील रावेर लोकसभेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांची सासरवाडी भुसावळची असल्याने त्यांच्या प्रचारासाठी पत्नी बबिता ब्राह्मणे या प्रचारासाठी सरसावल्या आहेत.

रणरणत्या उन्हात दौरा : वंचितला संधी देण्याचे आवाहन
सौ.बबिता संजय ब्राह्मणे यांनी शनिवारी सायंकाळी रविवारी दुपारी भुसावळ तालुक्यातील बोहर्डा-बोहर्डी, पिंपळगाव, तळवेल, कपिलनगर, ऑर्डनन्स फॅक्टरी भागात प्रचार दौरा केला. गावा-गावातील वस्त्या, वाड्यांपर्यंत महिला व पुरूष मतदारांशी सौ.ब्राह्मणे यांनी संपर्क साधला.

रावेर लोकसभेत यंदा वंचित आघाडीने उच्चशिक्षीत उमेदवार संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन बबिता संजय ब्राह्मणे यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. गेल्या दहा वर्षात मतदारसंघात कुठेही विकास झाला नसल्याने मतदारांनी वंचितला एकवेळा संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी महिला आघाडीच्या वंदना सोनवणे व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कॉपी करू नका.