रावेर लोकसभेच्या आखाड्यात श्रीराम पाटलांच्या विजयासाठी आमदार शिरीष चौधरी मैदानात

दणक्यात केला प्रचाराचा शुभारंभ : श्रीराम पाटील यांना विजयाचे मतदारांना आवाहन

0

रावेर : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा रविवारी रावेर शहरात आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. रावेरवासीयांचे ग्रामदैवत असलेल्या पाराच्या गणपती मंदिरात प्रचार नारळ वाढविण्यात आला. राजकारणातील कोरी पाटी मात्र शून्यातून विश्व उभारलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासाठी आमदार चौधरींनी ताकद पणाला लावली आहे. यशस्वी उद्योजक असलेल्या श्रीराम पाटील यांना मतदारांनी एक संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केले.

या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा शिवसेना (उबाठा गट) उपप्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणपतीची पूजा करून आरती करण्यात आली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, विनायक महाजन, एस.आर.चौधरी, अशोक शिंदे, सुरेश चिंधू पाटील, अब्दुल मुतालिब, संजय वाणी, सोपान बाबुराव पाटील, सादीक मेंबर, आयुब मेंबर, यशवंत धनके, अ‍ॅड.टी.डी.पाटील, अ‍ॅड.आर.आर.पाटील, योगेश बारी, ज्ञानेश्वर महाजन, प्रा.डी.एस.चौधरी, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, सउद शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत
कार्यकर्त्यांनी रावेर शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मतदारांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या मताधिक्याने श्रीराम पाटील यांना विजयाचे आवाहन यावेळी करण्यात आले.


कॉपी करू नका.