चोपडा तालुक्याचा विकास हाच ध्यास : खासदार रक्षाताई खडसे

नरेंद्रजी मोदी यांना तिसर्‍यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदानाचे आवाहन

0

चोपडा : चोपडा तालुक्याचा विकास हाच ध्यास आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात अनेक विकासकामे करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला व पुन्हा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी भाजपाला संधी द्यावी, असे आवाहन रावेर लोकसभा महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुक्यात केले. चोपडा तालुक्यातील वडगाव,, अडावद, मालापुर, विरवाडे, नरवाडे, आडगाव आदी भागांमध्ये त्यांनी प्रचार दौरा केला.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मधील रावेर लोकसभ क्षेत्रातील भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे आदी मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह चोपडा तालुक्यात प्रचार दौरा केला. चोपडा तालुक्यातील मौजे वडगाव, अडावद, मालापूर, विरवाडे, नरवाडे, आडगाव आदी गावांमध्ये प्रचारार्थ त्यांनी भेटी दिल्या. मतदारांशी संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले.

 


कॉपी करू नका.