यावल न्यायालयात 27 जुलै रोजी लोकअदालत

0

यावल : यावल न्यायालयात रविवार, 5 मे रोजी लोकअदालत होणार होती  मात्र ही लोक अदालत 27 जुलै रोजी होणार असल्याचे न्यायालयाकडून जाहिर करण्यात आले आहे.

27 जुलैला होणार लोक अदालत
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये व यावल येथील दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सह दिवाणी न्यायाधीश व्ही.एस.डामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती व यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 5 मे रोजी यावल न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते मात्र, काही कारणात्व ही लोकअदालत पुढे ढकलण्यात आली. आता लोकअदालत 27 जुलै रोजी होईल, अशी माहिती न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक सी.एम.झोपे यांनी दिली. लोकन्यायालयात बँकेची, इतर वित्तीय संस्था, तालुक्यातील ग्रामपंचायत, बी.एस.एन.एल आणि विद्युत बिलांचे दाखलपूर्व प्रकरणे, न्यायालयातील प्रलंबित विवाह वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले आहेत. लोक न्यायालयात पक्षकारांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणावर तडजोड करून वाद विवाद संपवावेत, असे आवाहन, यावल तालुका विधी सेवा समितीकडून पक्षकारांना करण्यात आले आहे.

 


कॉपी करू नका.