चोपडा तालुक्याचा चौफेर विकास हाच ध्यास : खासदार रक्षाताई खडसे

चोपड्यात महाविजय संकल्प रॅली : भाजपाला मतदान करण्याचे आवाहन

0

चोपडा : चोपडा तालुक्यासह परिसराचा आगामी काळात चौफेर विकास करण्याची ग्वाही रावेर लोकसभेतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली. चोपडा शहर व परिसरात त्यांनी प्रचार रॅली काढत भाजपाला मतदानाचे आवाहन केले.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह चोपडा शहर येथे प्रचारार्थ भेट दिली. मुख्य रस्त्याने महाविजय संकल्प रॅली काढून, मतदारांशी संवाद साधला व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.

 


कॉपी करू नका.