अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीची हत्या : प्रियकरासह पहूरमधील त्रिकूट जाळ्यात

घर विक्रीच्या पैशातून प्रियकरासोबत राहण्याच्या मनसुब्यावर फेरले पाणी : पत्नीच्या चौकशीत बिंग उघड

0

Murder of husband who obstructs immoral relationship: Threesome in Pahur with lover पहूर  : अनैतिक संबंधात पती कायम अडसर ठरू लागल्याने पत्नीने प्रियकर व त्याच्या पहूर, ता.जामनेर येथील अन्य तीन साथीदाराची मदत घेत पतीचा खून केला मात्र पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर पहूरमधील तिघांसह छत्रपती संभाजी नगरातील प्रियकर व प्रेयसीवजा आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गणेश जगन्नाथ दराखे (रा.छत्रपती संभाजीनगर) असे मयताचे नाव आहे.

दोन लाखात दिली सुपारी
रुपाली गणेश दराखे (रा.संभाजीनगर) या विवाहितेचे सुपडू सोनू गायकवाड (35, कुर्‍हाड, ता.पाचोरा) या तरुणाशी सूत जमले होते मात्र अनैतिक संबंधात पती गणेश दराखे अडसर ठरू लागल्याने पत्नीनेच पतीचा काढा काढण्याचे ठरवले व ही बाब प्रियकराजवळ बोलून दाखवली. त्यातच गणेश दराखेने आपले घर 21 लाख रुपयात विक्री केल्यानंतर रक्कम आल्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत दोन लाखात पतीला मारण्याची पहूरच्या अमोल चौधरीला सुपारीही दिली. 4 रोजी बांधकाम मिस्तरी असलेला गणेश दराखे हा कामावर निघाल्यानंतर रस्त्यात आरोपींनी गाठत त्याची गळा चिरून हत्या केली. संभाजीनगर पोलिसांना खुनाबाबत संशय आल्यानतंर त्यांनी पत्नी रुपाली दराखेला ताब्यात घेतल्यानंतर बोलते करताच तिने अनैतिक संबंधाची कबुली दिली.

पहूरच्या तिघा आरोपींना अटक
छत्रपती संभाजीनगरातील गणेश दराखे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी पहूर येथील अमोल चिंतामण चौधरी (33), अजय दिलीप हिवाळे (25), अनिकेत कडूबा चौथे (24, सर्व राहणार पहूर कसबे, ता.जामनेरख जि.जळगाव) यांना यांना अटक करण्यात आली. तिघांविरोधात संभाजीनगरच्या सिडको पोलिसात गुरनं.295/2024 भादंवि 302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार संजय नंद, विजय निकम, विजय भाणुसे, मनोहर गीते, चालक संतोष चौरे आदींनी पहूरचे निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील अंमलदार गोपाल गायकवाड, ज्ञानेश्वर ठाकरे, विलास चव्हाण यांच्या मदतीने तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, अनिकेत चौथे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे.


कॉपी करू नका.