शिवसेनेचा ‘नही’च्या अधिकार्‍यांना घेराव


महामार्गावर धुळीमुळे वाढले अपघात : उपाययोजनांची मागणी

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे रात्रीच्या वेळी धूळ उडत असल्यानेे समोरचे वाहन दिसेनासे होते यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होऊन जीवीतहानी होत असून घटनेची गंभीर दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ उपाय योजना आखाव्यात, यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांना येथील तहसील कार्यालयाच्या आवारात शिवसेनेतर्फे घेराव घालण्यात आला. यावर उपाय योजना न झाल्यास शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.

नहीचे अधिकारी आल्यानंतर घेराव
भुसावळ तहसील कार्यालयात नहीचे अधिकारी सुजानसिंग आले असता त्यांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेराव घातला. महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट उठत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी समोरील वाहन दिसत नसल्याने वाहन अपघात वाढले आहे. प्रवासी जखमी अवस्थेत निघून जात आहेत. या वेळी रात्री अपघाताचा घडलेला प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून अधिकारी व ठेकेदार यांना दाखवला. दरम्यान, सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन प्रकल्प अभियंते सुजान सिंह यांनी दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !