उमेदवार श्रीराम पाटील यांना आठवला संघर्षाचा काळ जन्मगावात डोळ्यातून तरळले अश्रू

तापी पट्ट्यातून भरघोस मतांनी निवडून देण्याचे केले आवाहन

0

रावेर : महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी गुरुवारी रावेर तालुक्यात प्रचार दौरा केला. दुपारी तालुक्यातील रणगाव या तापी नदीकाठच्या आपल्या जन्मगावी प्रचारासाठी येताच श्रीराम पाटील भावनाविवश झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

बलवाडी येथून प्रचार दौर्‍याला सुरूवात
रावेर तालुक्यातील प्रचार दौर्‍याला बलवाडी येथून सुरुवात झाली. त्यानंतर सिंगनूर, दसनूर, आंदलवाडी, सुनोदा, गाते, उधळी, रणगांव या गावांना भेटी दिल्या. मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी श्रीराम पाटील यांनी केले. प्रचार दौर्‍यात ते दुपारी रणगाव येथे आले. मामा चिंतामण यादव चौधरी यांच्याकडे लहानपणी ज्या घरात ते राहत असत तिथे येताच त्यांना आपल्या संघर्षाचा भूतकाळ आठवला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शालिक चौधरी, अरुण चौधरी, रमेश कोळी, गणेश पाटील, सतीश कोळी, भागवत चौधरी आणि विजय पाटील या शाळेतील त्यांच्या सवंगड्यांनी त्यांचे स्वागत केले आणि या संपूर्ण तापी पट्ट्यातून भरघोस मते त्यांना देण्याचे अभिवचन दिले. प्रचार दौर्‍यात किसान सभेचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेनेचे (उबाठा गट) जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील तालुकाध्यक्ष किशोर पाटील डॉ राजेंद्र पाटील, राजू सवर्णे, दीपक पाटील, शशांक पाटील, बलवाडी सरपंच वर्षा महाजन अनिल तायडे, महाविकास आघाडीचे सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.