जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेने डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे अधिकारी ठार

0

जळगाव : जळगाव शहरातील बैठकीसाठी आलेले डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी अधिकारी हे रात्री जेवण झाल्यानंतर मित्राला भेटण्यासाठी एका हॉटेलात गेले. तेथून परततांना भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनाने जोरदार धडक दिल्याने डॉ.हर्षद भाऊराव लांडे (43, रा.गोरवले रोड, पोर्तुगीज चर्चजवळ, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल रॉयल पॅलेससमोर घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मित्राला भेटण्यासाठी गेल्यानंतर गाठले मृत्यूनेे
डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर डॉ.हर्षद लांडे हे वडील, पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत मुंबई येथील पोर्तुगीज चर्चजवळ वास्तव्याला होते. बुधवार, 8 मे रोजी मध्यरात्री 1 वाजता ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या मिटींगसाठी ते आपल्या टिमसह शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. बुधवार, 8 मे रोजी दिवसभर त्यांनी मिटींगला हजेरी लावली. मिटींग आटोपल्यानंतर ते त्यांनी सहकार्‍यांसोबत जेवण केले. त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास ते आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक दरम्यान शतपावली करीत सागर पार्क जवळील एका हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यासाठी गेले.

रस्ता ओलांडतांना दिली धडक
मित्राची भेट घेतल्यानंतर डॉ. हर्षद लांडे हे रस्ता ओलांडत असताना काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणीकडे जाणार्‍या भरधाव कारने लांडे यांना धडक दिली. या धडकेत लांडे हे सुमारे 10 ते 15 फुट अंतरावर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरून जाणार्‍या नागरीकांनी मदतीची धाव घेवून खासगी चाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

तपासणीअंती केले मयत घोषीत !
अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षद लोटे यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार इरफान मलिक आणि कॉन्स्टेबल विजय जाधव करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.


कॉपी करू नका.