जळगावातील 33 वर्षीय महिलेवर भुसावळात अत्याचार

0

A 33-year-old woman in Jalgaon was assaulted in Bhusawal भुसावळ : जळगाव शहरातील एका भागातील 33 वर्षीय महिलेवर भुसावळ शहरातील दोन लॉजवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडीतेच्या मुलांना रेल्वे रूळावर टाकून मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेने केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनोद इंगळे (उचंदा, ता.मुक्ताईनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलांना ठार मारण्याची धमकी देत अत्याचार
जळगाव शहरातील एका भागात 33 वर्षीय पिडीता आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. 12 फेब्रुवारी ते 12 मार्च 2024 दरम्यान पीडीतेच्या मुलांना रेल्वे रूळावर टाकून जीवे ठार मारण्याची धमकी संशयित आरोपी विनोद इंगळे (रा.उचंदा, ता.मुक्ताईनगर) याने महिलेला दिली व भुसावळातील सुरभी लॉज आणि खडका चौफुलीवरील हॉटेल यशोदा येथे वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेला तक्रारीत केला आहे. पीडीतेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून संशयित आरोपी विनोदी इंगळे (उचंदा) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.


कॉपी करू नका.