नवरात्रोत्सवानिमित्त 10 गाड्यांना विंध्याचलला थांबा
भुसावळ : चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे विभागातून धावणार्या दहा गाड्यांना विंध्याचल रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरुपात थांबा देण्यात आला आहे. चैत्र नवरात्रोत्सवानिमित्ताने 25 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान गाडी क्रमांक अप 12335 भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, डाऊन 12336 लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर एक्सप्रेस, अप15646 गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 15645 लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्सप्रेस, अप 15648 गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, डाऊन 15647 लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेस, अप 12142 पाटलीपूत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, डाऊन 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्स्प्रेस, अप 12168 मंडुआडीह-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, डाऊन 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंडुआडीह एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
