साकळीनजीक रिक्षातून लाखाचा गुटखा जप्त : तिघांना अटक


Gutkha worth lakhs seized from a rickshaw near Sakali : Three arrested यावल : यावल तालुक्यातील साकळी या गावाजवळील भोनक नदीच्या पुलावर एका रिक्षातून राज्यात प्रतिबंधात्मक गुटख्याची वाहतूक होत असताना पोलिसांनी कारवाई केली. एक लाख 37 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
साकळी, ता.यावल या गावाजवळ भोनक नदी आहे. या भोनक नदीच्या पुलावरून रिक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.डब्ल्यू. 3549) मध्ये प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले (रा.यावल), शेख रफिक शेख मुनाफ मन्यार (रा.साकळी), संदीप उर्फ बापू सोपान धनगर (रा.यावल) हे तिघे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना यावल पोलिसांना आढळले. यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार सिकंदर तडवी, अलाउद्दीन तडवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. रिक्षा तसेच प्रतिबंधित विमल गुटखा असा एकूण एक लाख 37 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अलाउद्दीन तडवी यांच्या फिर्यादीवरून वरील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !