भुसावळात हद्दपार आरोपी भैंस की मुंडी पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत शहरात वास्तव्य करणार्या अक्षय उर्फ भैंस की मुंडी कैलास बडगुजर (22, रा.अण्णा भाऊ नगर, भुसावळ) यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शनिवारी रात्री अटक केली. आरोपीविरुद्ध हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शहरातील टिंबर मार्केट परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोडे, बाजारेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, नाईक रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.

