रावेर तालुक्यातील वादळ वार्याचा 29 गावांना तडाखा : 600 हेक्टर केळी जमीनदोस्त
सुमारे पंचवीस कोटीचे नुकसान ः आमदार शिरीष चौधरी यांनी केली पाहणी
रावेर : रावेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे 29 गावातील सुमारे 700 शेतकर्यांच्या 600 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले. सात गावातील 345 घरांचे घरावरील पत्रे व पडझड होवून नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल रविवारी जिल्हाधिकार्यांना तहसील कार्यालयातर्फे पाठविण्यात आला आहे.
शेतकर्यांवर पुन्हा ओढवले संकट
रावेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस होवून तालुक्यातील केळी पीक जमीनदोस्त होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभाग व कृषी विभाग यांनी व पंचायत समिती विभागातर्फे नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. तो पुढील प्रमाणे – तालुक्यात केळी पिकाचे झालेले अंशतः नुकसान शेतकरी संख्या व बाधीत क्षेत्र असे – खिरोदा प्र. यावल 56 शेतकरी 95 हेक्टर नुकसान, कळमोदा 20 शेतकरी 34 हेक्टर, सावखेडा बु॥ 8 शेतकरी 14 हेक्टर, सावखेडा खु॥ 7 शेतकरी 13 हेक्टर, अटवाडे 120 शेतकरी 90 हेक्टर, दोधे 55 शेतकरी 40 हेक्टर, नेहेते 18 शेतकरी 10 हेक्टर, खानापूर 28 शेतकरी 12 हेक्टर, निरूळ 7 शेतकरी 6 हेक्टर, चोरवड 7 शेतकरी 6 हेक्टर, अजनाड 20 शेतकरी 19 हेक्टर, पाडळे खु॥ 10 शेतकरी 7 हेक्टर, कर्जोद 17 शेतकरी 8 हेक्टर, वाघोड 7 शेतकरी 5 हेक्टर, अहिरवाडी 9 शेतकरी 4 हेक्टर, मोहगण 3शेतकरी 2 हेक्टर, सावदा 15 शेतकरी 12 हेक्टर, रायपूर 5 शेतकरी 3 हेक्टर, सुदगाव 3 शेतकरी 2 हेक्टर, रणगाव 5 शेतकरी 3 हेक्टर, उदळी खु॥ 3 शेतकरी 2 हेक्टर, चिंचाटी 22 शेतकरी 25 हेक्टर, तांदलवाडी 100 शेतकरी 75 हेक्टर, मांगलवाडी 18 शेतकरी 8 हेक्टर, सिंगत 28 शेतकरी 18 हेक्टर, बलवाडी 32 शेतकरी 23 हेक्टर, थोरगव्हाण 6 शेतकरी 5 हेक्टर, पुरी 47 शेतकरी 42 हेक्टर, गोलवाडे 15 शेतकरी 13 हेक्टर असे एकूण रावेर तालुक्यातील 29 गावातील 704 शेतकर्यांचे 602 हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे पंचवीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

345 घरांचे नुकसान
रावेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळामुळे सात गावातील 345 घरांची पडझड होवून घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. यात नुकसान झालेल्या घरांची संख्या गावनिहाय – तांदलवाडी 300, सिंगत 23, बलवाडी 10, अटवाडे 5, सहस्त्रलिंग 4, मांगलवाडी 2, खिरोदा प्र. यावल 1 असे एकूण सात गावातील 345 ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.
आमदार शिरीष चौधरी यांनी केली पहाणी
रावेर तालुक्यात शनिवारी झालेल्या प्रचंड वेगाच्या वादळी वार्यामुळे दोधे, नेहेते, अटवाडा अजनाड, खिरोदा, सावखेडासह अनेक शेतकरी बांधवांच्या केळी बागा पडून गेल्यामुळे शेतकरी बांधवांवर संकट उभे राहिले आहे. रविवारी आमदार शिरीष चौधरी यांनी दोधे, नेहेते, अटवाडा या परिसरातील नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर देऊन तहसीलदार यांच्या सोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.राजेंद्र पाटील, जयेश कुयटे, पंचायत समितीचे माजी सदस्य योगेश पाटील, सुनील पाटील, राहुल महाजन, गोपाळ महाजन, कांतीलाल पाटील, विलास पाटील, गोकुळ महाजन, रुपेश महाजन, भगवान धनगर, हितेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.