रावेर उर्दू हायस्कूलचे स्नेहसंमेलन रंगले


रावेर : शहरातील उर्दू हायस्कूलचे स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी कलागुणांची उधळण करीत उपस्थितांची दाद मिळवली. रावेर तालुका उर्दू एज्युकेशन सोसायटी रावेर संचलित उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन तसेच गुणवंतांना पारीतोषिक वितरण तसेच निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.एस.एस.सैय्यद होते. प्रमुख पाहुणे सैय्यद आरीफ, शेख आरीफ, सल्लाउद्दीन साहब, सैय्यद शाहनवाज साहब, अ‍ॅड.शमशेर, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मीन तडवी, अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक महमूद , रसलपूर हायस्कूलचे मुख्याध्यापक शकील पठाण, केंद्रप्रमुख कमाल होते. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाची सुरुवात आठवीची विद्यार्थिनी तसकीन जहाँ ने कुराण पठन करून केली. सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनी तायबा नाज, लफीयाने केली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी नाटक, गीत, एकांकिका सादर केल्या. आभार अजहर यांनी मानले. यशस्वीतेसाठी जाहीद, अजीम, इसहाक, संजीदा, अन्सार आदी शिक्षकवर्गासह विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !