बोदवड बसस्थानकातून महिलेची पोत लांबवली


बोदवड : शहरातील बसस्थानकातून रविवारी शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेल्या सुरेखा गजानन पाटील (33) या महिलेच्या गळ्यातील पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी सुरेखा पाटील यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक गजानन काळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !