बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मारहाणीनंतर दिले ‘हे’ स्पष्टीकरण


Bollywood actress Kangana Ranaut gave ‘this’ explanation after beating मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेली बॉलिवूड अभिनेत्री व खासदार कंगना रणौत चंडीगड विमानतळावर झालेल्या मारहाणीमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सीआयएसएफमधील महिला जवान कुलविंदर कौर हिने कंगणाच्या कानात लगावल्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. मारहाणीत संदर्भात कंगणाने व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून नुकतीच लोकसभा निवडणूक कंगना राणौतने जिंकली आहे. कंगना रणौतने लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये पक्षाच्या (भाजप) बैठकीसाठी येत असताना चंदीगड विमानतळावर तिच्यासोबत हा प्रकार घडला. एका महिला सीआयएसएफ जवानाने कंगना राणौतच्या चेहर्‍यावर थापड मारल्याचे समोर आले आहे. कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव आहे.



मारहाणीनंतर दिले स्पष्टीकरण
कंगनाने व्हिडिओ शेअर करत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या कंगना म्हणते, ‘माझ्या हितचिंतकांचे आणि माध्यमांचे मला सातत्याने फोन येत आहेत. मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छिते की, मी सुरक्षित आहे. चंदीगड विमानतळावर माझ्यासोबत एक घटना घडली. जेथे क्रॉसिंग करताना एका महिला जवानाने माझ्या तोंडावर हिट केले. तिने असे का केले? तेव्हा ती म्हणाली की, ती शेतकर्‍यांची सपोर्टर आहे. मी सुरक्षित आहे. मात्र, पंजाबमधील वाढता दहशतवाद कसा हाताळायचा ही माझी चिंता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !