नाशिकमधील सराफाचा संशयास्पद मृत्यू : हैद्राबाद पोलिसांवर दाखल व्हावा गुन्हा
एरंडोलमधील सराफा बांधवांची निवेदनाद्वारे पोलिस व तहसील प्रशासनाकडे मागणी
एरंडोल : नाशिक येथील सराफ स्व.विजय बुधाशेठ बिरारी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी हैद्राबाद येथील दोषी असलेल्या अधिकारी व पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी तसेच कलम 411 मध्ये सुधारणा करून हे कलम जामीनपात्र करावे आदी मागण्यांसाठी शहरातील सराफ बांधवांनी सोमवारी प्रतिष्ठाने बंद ठेवत मोर्चा काढून पोलिस प्रशासन तसेच तहसील प्रशासनाला निवेदन दिले. याप्रसंगी शहरातील सर्व सराफा बांधवांसह समाजबांधवदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
