साकेगावातील दुग्ध व्यावसायीकाचा भुसावळात खून
खुनाने पुन्हा हादरले भुसावळ : खुनानंतर आरोपी पसार
भुसावळ : साकेगाव येथील 40 वर्षीय दुग्ध व्यावसायीकाचा भुसावळातील जुना सतारा भागातील कोळी वाड्यात भर दिवसा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नासीर पटेल (40, रा.साकेगाव, ता.भुसावळ) असे मयताचे नाव असून धीरज गणेश शिंदे (22, जुना सातारा, भुसावळ) असे संशयीत आरोपीचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन वेळा रॉड मारताच झाला मृत्यू
साकेगाव येथील रहिवासी असलेले नासीर पटेल हे दुग्ध संकलन विक्रीचे काम करतात शिवाय ते भुसावळातील मामाजी टॉकीज नजीकच्या विशाल डेअरीवर कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सायंकाळी पाच वाजता दुचाकी (एम.एच.19 ए.डी.2006) वरून डेअरी मालकाच्या मुलासह जुना सातारा भागातील कोळीवाड्यात गेले होते. दुचाकी लावल्यानंतर ते नेहमीच्या ग्राहकांकडे दुध देत असतानाच समोरच राहणार्या धीरज गणेश शिंदे (22, जुना सातारा, भुसावळ) या संशयीताने लोखंडी रॉडने पटेल यांच्या डोक्यावर रॉड मारल्याने ते जमिनीवर कोसळले तर पुन्हा त्यांच्यावर जोरदार रॉडने हल्ला चढवण्यात आल्याने अतिरक्तस्त्राव होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.


