निंभोरा पोलीस ठाण्यातील लाचखोर फौजदाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी


Nimbhora police station briber Faujdar two days in custody भुसावळ : गुटखा प्रकरणात इर्टीगा वाहन जप्त केल्यानंतर ते न्यायालयाने सोडण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले मात्र वाहन सोडण्यासाठी सुरूवातीला 15 हजार व तडजोडीअंती दहा हजार रुपये मागणार्‍या निंभोरा, ता.रावेर पोलीस ठाण्यातील फौजदार कैलास विश्वनाथ ठाकूर (56, रा.निंभोरा, ता.रावेर) यास जळगाव एसीबीने बुधवारी दुपारी निंभोर्‍यातून अटक केली होती. दुसर्‍या दिवशी गुरुवारी संशयीताला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
जळगावच्या सिंधी कॉलनीतील तक्रारदाराचे वाहन गुटखा प्रकरणात निंभोरा पोलिसांनी जप्त केले होते. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या कारवाईनंतर तक्रारदाराने वाहनाचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर वाहन सोडण्याचे आदेश मिळाले व हे आदेश फौजदार कैलास ठाकूर यांना दाखवल्यानंतर त्यांनी बुधवार, 12 रोजी 15 हजारांची लाच मागितली व दहा हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यात लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर निंभोर्‍यात सापळा रचण्यात आला. फौजदाराच्या घराजवळील मरिमाता मंदिराजवळ तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताच फौजदाराला पंचांसमक्ष पथकाने पकडले. ज्या पोलीस ठाण्यात काम केले त्याच पोलीस ठाण्यात स्वतःवर गुन्हा दाखल करून घेण्याची दुर्दैवी वेळ फौजदारावर आली तर या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास डी.देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा एन.जाधव व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, कॉन्स्टेबल सचिन चाटे तसेच हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, नाईक सुनील वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !