चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : तीन कट्टे व दहा जिवंत काडतूसासह आरोपी जाळ्यात
Chopra rural police big operation: Accused in the net with three knives and ten live cartridges चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी वैजापूर गावाच्या हद्दीत खार्यापाडाव ते वैजापूर रोडवर संशयीतीाकडून तीन देशी गावठी कट्टे आणि 10 जिवंत काडतूस जप्त केले. याप्रकरणी राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (रा. पारउमटी जि. बडवाणी) यास अटक करण्यात आली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मंगळवार, 11 जून रोजी 4.45 वाजेच्या सुमारास वैजापूर गावचे हद्दीत खार्यापाडाव ते वैजापूर रोडवर राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा यास पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडून प्रत्येकी 30 हजार किंमतींचे तीन गावठी कट्टे (पिस्टल) लोखंडी स्टील धातुचे, त्यास काळ्या रंगाची मुठ, त्यावर लाा रंगाचे स्टारचे चिन्ह असलेल्या मॅगझिन्ससह व 10 हजार किंमतीचे पिवळ्या धातूचे 10 काडतूस जप्त करण्यात आले.

