लग्न झाल्याचे कळताच प्रियसीने केला प्रियकराचा खून


पुणे : पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकरासोबत आळंदीत विवाह लागल्यानंतरही प्रियकराने अन्य तरुणीशी लग्न केल्याचे कळताच संतप्त प्रियसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना नर्हे येथील एस.के.नाईक कंपनीसमोर मंगळवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत महंतेश बिरादार (28, रा.संख किरंडी, ता.जत, जि.सांगली) या तरुणाचा खून झाला तर संशयीत आरोपी अनुराधा करे (24, रा़ नारायण निवास, नर्हे – धायरी रोड, नर्हे, मूळ, करेवाडी, ता.जत, जि.सांगली) ही तरुणी स्वत: च पोलिस चौकीत हजर झाली व आपल्या प्रियकराचा खून केल्याची कबुली दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !