रावेरमध्ये नाफेडमार्फत तूर खरेदीला सुरुवात


94 शेतकर्‍यांनी केली ऑनलाईन नोंदणी

रावेर : रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांकडून प्रत्यक्षात नाफेड मार्फत तुर खरेदीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. शासनाने प्रती क्विंटल पाच हजार आठशेचा भाव निश्चित केला असून आतापर्यंत 94 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. रावेर शहरातील आठवडे बाजार समितीच्या आवारात खरेदी विक्री संघातर्फे तूर खरेदी केंद्राला सुरुवात झाली. खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, बाजार व समिती सभापती श्रीकांत महाजन यांच्याहस्ते खरेदीचा शुभारंभ झाला.

25 क्विंटल खरेदीचे निकल
शासनाकडून प्रति क्विंटल पाच हजार आठशेचा भाव निश्चित करण्यात आला असून प्रत्येक शेतकर्‍याकडून प्रत्येक हेक्टरी सहा क्विंटल 64 किलो तूर खरेदी केली जाणार असून जास्तीत-जास्त एका शेतकर्‍यांकडून 25 क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे. प्रसंगी डीएमओ परीमल साळुंखे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, व्हा.चेअरमन चौधरी, बी.एम.पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, संचालक निलेश चौधरी, बाजार समिती संचालक पितांबर पाटील, संचालक लक्ष्मण मोपारी, अशोक चौधरी, शेतकरी भगवान चौधरी, खरेदी-विक्री संघ मॅनेजर विनोद चौधरी, ग्रेडर प्रशांत पाटील, सुनील महाजन आदी शेतकरी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !