पत्नीचा छळ : न्यायाधीश पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा


मुक्ताईनगर : तालुक्यातील कोर्‍हाळा येथील माहेर व काबरखेड (ता.मोताळा) येथील सासर असलेल्या 19 वर्षीय विवाहितेचा शारीरीक व मानिसक छळ करून तिच्या इच्छेविरूद्ध अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी वरुड तालुका न्यायालयाच्या न्यायाधीशासह सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लक्ष्मी ज्ञानेश्वर सोनोने या विवाहितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
लक्ष्मी सोनोने यांच्या तक्रारीनुसार, वरूड न्यायालयाचे न्यायाधीश तथा पती ज्ञानेश्वर कृष्णा सोनोने, सासरे कृष्णा सोनोने, सासू अनसुयाबाई सोनोने, नणंद मुक्ता तायडे (सर्व रा.काबरखेड, ता.मोताळा) तसेच नणंद रजनी चंद्रकांत भोलाणकर व नंदोई चंद्रकांत भोलाणकर (रा.मलकापूर, जि.बुलढाणा) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 377, 498 (अ), 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी संगनमत करीत फिर्यादीस स्वयंपाक येत नाही अशा कुरापती काढत क्रुर वागणूक देत शारीरीक छळ करून फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर यांनी फिर्यादीला मारहाण शिवीगाळ करून फिर्यादीचे ईच्छेविरूध्द जबरीने अनैसर्गिक शारीरीक संभोग ठेवत फिर्यादीचे मोबाईल फोनमध्ये अश्लील फोटो काढले व क्रूर वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोताळा तालुक्यातील काबरखेड येथील सासरी तसेच पतीचे नोकरीचे ठिकाण असलेल्या वरुड येथे 23 जून 2018 च्या तारखेनंतर दहा ते पंधरा दिवसांनी ते 2 फेब्रुवारी 2019 या काळात छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !