भुसावळात चाकू हल्ला : पाच आरोपी जाळ्यात


भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : अन्य दोघा पसार आरोपींचा कसून शोध सुरू

भुसावळ : पूर्व वैमनस्यासह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदावरून झालेल्या वादानंतर भुसावळातील अशोक नगर भागातील किरण खरात यांच्यावर सात जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवार, 28 रोजी दुपारी तीन वाजता अशोक नगरात घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री पाच आरोपींना अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले असून अन्य दोघा पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

पाच आरोपींना अटक
तक्रारदार किरण अशोक खरात यांच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी संशयीत आरोपी सुभाष उर्फ विठ्ठल श्रीराम मोरे, संदीप भीमराव खंडारे, धीरज वसंत खंडारे, विजय शेषराव भालेराव, गोल्या उर्फ (अक्षय) भीमराव खंडारे यांना अटक करण्यात आली असून अजय विजय भालेराव व ऋषिकेश सुभाष मोरे यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, समाधान पाटील, ईश्वर भालेराव आदींनी आरोपीला अटक केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !