भुशी धरणात संपूर्ण कुटूंबच वाहिले : तिघांचा मृतदेह हाती
The entire family was buried in the Bhushi dam : the bodies of three were recovered लोणावळा : भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका परिवारातील पाच जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत तिघांचा मृतदेह हाती आला असून दोघांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाकडून सुरू आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
एकाच परिवारातील पाच जण वाहिले
नूर शाहिस्ता अन्सारी (35), अमिना अदिल अन्सारी (13), मारिया अन्सारी ( 7), हुमेदा अन्सारी (6) आणि अदनान अन्सारी (4, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) अशी भुशी धरणात वाहिलेल्यांची नावे आहेत. मारिया आणि अदनान अद्याप बेपत्ता असून उर्वरित तिघांचे मृतदेह सापडले आहेत. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील अन्सारी परिसरातील 15 ते 16 जण रविवारच्या सुटीचे औचित्य साधून लोणावळ्यात वर्षाविहारासाठी सकाळी आले होते. ते सर्व जण 12 वाजेदरम्यान लोणावळ्यातील भुशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेल्यानंतर कुटूंबच पाण्यात वाहून गेले.

पाणी वाढताच कुटूंब वाहिले
लोणावळा परिसरात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असतानाच भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले व दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणार्या धबधब्यातून वाहणार्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत असताना एकाच परिवारातील पाच जण वाहून गेले.
पाच जण बचावले मात्र पाच वाहिले
लग्नसोहळ्याच्या निमित्ताने अन्सारी कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र आले होते. चार दिवसांपूर्वी लग्न झाले. लग्नासाठी आग्रा येथून नातेवाईकांसह अन्सारी कुटुंबीय पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्याला गेले मात्र धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने अन्सारी कुटुंबातील दहा जण वाहून गेले. पाच जण सुखरूप बाहेर पडले मात्र पाच जण वाहून गेले, तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून दोघे बेपत्ताच आहेत.
