भुसावळातील लष्करी डेपोत चिखलीच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या


भुसावळ : भुसावळातील लष्करी डेपोत महिनाभरापूर्वीच कंपनीसोबत दाखल झालेल्या चिखली येथील 32 वर्षीय जवानाने स्वतःच्या रायफलमधून गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजून पाच मिनिटांनी घडली. मंगेश जीनवार भगत (32 रा. चिखली ता. बुलढाणा) असे या मृत जवानाचे नाव आहे. भुसावळाती लष्करी डेपोतील वॉटर पॉईंट ड्युटीवर असतानाच जीनवार यांनी रायफलमधून बुधवारी सकाळी गोळी झाडल्याने खळबळ उडाली. शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या जवानाने आत्महत्या का केली? याचे अद्याप कारण कळू शकलेले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहजिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !