सुरवाडा बुद्रुक येथील युवकाची आत्महत्या
बोदवड : तालुक्यातील सुरवाडा बु.॥ येथील राजेश समाधान उर्फ दगडू गणथळे (22) या युवकाने बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुरवाडा शेत शिवारातील दगडू चौदास चौधरी यांच्या शेताच्या बांधावर निंबाच्या झाडाला दोन बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील स्पष्ट कारण अद्याप कळालेले नाही. या प्रकरणी बोदवड पोलिसात संजय पंडित तेली (32) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.

