मधुकरप्रमाणे जे.टी.महाजन तंत्रनिकेतन बंदच्या मार्गावर?


जे.टी.महाजन तंत्रनिकेतनच्या कर्मचार्‍यांची 18 महिन्यांपासून उपासमार

फैजपूर : जे.टी.महाजन तंत्रनिकेतनमधील सर्व कर्मचारी 26 फेब्रुवारीपासून 18 महिन्यांचा पगार मिळविण्यासाठी आंदोलन करीत असून कर्मचार्‍यांना ऑक्टोबर 2018 पासून आजपर्यंत कुठलाच पगार मिळालेला नाही व त्यांची आर्थिक, मानसिक कुचंबणा होत आहे. व्यवस्थापन मंडळास अनेक वेळा लेखी व तोडी विनंती करूनदेखील त्यांनी जातीने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बुधवारी दुपारी तीन वाजता आयोजित पत्रकार परीषदेत करण्यात आला. गेल्यावर्षी शाळेच्या खात्यात विद्यार्थ्यांकडून व शासनातर्फे शिष्यवृत्ती सुमारे पाच कोटी एक्कावन्न लाख आले मात्र त्यानंतर अवघ्या एका महिन्याचा पगार करण्यात आला तर उर्वरीत पगार न देता संस्थेचे संचालक मंडळातर्फे व माजी प्राचार्य यांच्या संगनमताने तंत्र शिक्षण मंडळाची संलग्नता काढून घेण्यात आली तसेच त्याचा फायदा घेत प्रथम व थेट द्वितीचय वर्षाचे प्रवेश नाकारून एकही पगार करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

18 महिन्यांपासून उपासमार
जे.टी.महाजन तंत्रनिकेतनमधील सर्व कर्मचारी 26 फेब्रुवारीपासून मागील 18 महिन्यांचे पगार मिळविण्यासाठी आंदोलन करीत आहेत. कर्मचार्‍यांना ऑक्टोबर 2018 पासून आजपर्यंत कुठलाच पगार मिळालेला नाह. व्यवस्थापन मंडळास अनेक वेळा लेखी व तोडी विनंती करूनदेखील त्यांनी जातीने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. दरम्यान, उन्हाळी परीक्षा 2020 च्या कामकाजावर व टर्मवर्कवर बहिष्कार घालण्यात आला असून अध्यक्ष फक्त चर्चा करू, असे खोटे आश्वासन देत असून निर्णय घेत नाही. या आंदोलनाचा आठवा दिवस असूनही अध्यक्ष जाणूनबुजून पगार करण्याचे टाळत आहेत. आजपर्यंत 10 ते 12 वेळेला त्यांना प्रत्यक्ष भेटून पगारासाठी विनंती करण्यात आली मात्र प्रत्येकवेळी चर्चा करून सांगतो, असे सांगून वेळकाढूपणा केला जात आहे. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !