यावल तालुक्यात दमदार पावसामुळे धरण भरले : नदी-नाले ओसंडले


यावल : यावल तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले काही धरण भरून ओसंडून वाहत आहेत. यात प्रामुख्याने वड्री धरण हे भरले असून खडकाई नदीला पूरदेखील आला. ग्रामीण भागातील छोटे-मोठे नदी नाले वाहू लागले असून चांगला पाऊस होत असल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मनुदेवी धबधब्यावर गर्दी
यावल शहर व तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वड्री जवळील वड्री धरण हे भरले आहे व सांडव्यातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हे धरण खडकाई नदीवर आहे व धरण भरल्याने खडखाई नदीला पूर आला आहे तर निंबादेवी धरण, श्री क्षेत्र मनुदेवी धरण, काळा डोह धरण व मोर मध्यम प्रकल्पात देखील चांगल्यापैकी जलसाठा साचला आहे. सातपुड्यातील पावसामुळे मनदेवी धबधबा प्रवाहीत झाला आहे तर ग्रामीण भागातील छोटे-मोठे नदी नाले हे वाहून निघाले आहेत. चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गांतून समाधान व्यक्त होत आहे. यावल तालुक्यात सध्या यंदाच्या पावसाळ्यात सरासरी 369.12 मिलीमीटर पावसाची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली. शनिवारी रात्री यावल महसूल मंडळात 10.01, फैजपूर महसूल मंडळात 08.00, भालोद महसूल मंडळात 10.00, बामणोद महसूल मंडळात 10.02, साकळी मंडळात 57.90 तर किनगाव मंडळात 67.40 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !